प्रेम भेट................!

Started by Vira, July 12, 2012, 09:02:23 AM

Previous topic - Next topic

Vira

प्रेम भेट.....................!




कॉलेजच्‍या पहील्‍याच दीवशी.
एक मुलगी मला दीसली,
पाहील्‍याबरोबरच
ती माझ्या मनात बसली.

तीही पहील्‍या नजरेत
माझ्याकडे बघुन हसु लागली,
मग काय.....
वेड्यासारख मला सर्वीकडे
तीचतर दीसु लागली.

तीच्‍याकडे बघता बघता
मित्रांनाही खांत्री पटली,
म्‍हणाले, अरे आपल्‍या मजनुलातर
जवळच लैला भेटली.

मित्रांनी संल्‍ला दीला.
आता म्‍हणे तीच्‍याशी
घंट्ट गाठ बांधुन टाक,
मौका भेटला कि
फटक्‍यात सांगुन टाक.

दीवस उलटू लागले
वेळ तर भरपुर वेळा आली,
पण तीला सांगण्‍याची
माझी हिंम्‍मतच नाही झाली.

कॉलेज संपले,
आणि सर्व मित्र मैत्रीनी पण
आपआपल्‍या मार्गाला गेले.

कॉलेज सोडायला
काही वर्ष होण्‍यात आली,
जॉबला लागलो
कामाच्‍या गरबडीत तीची
आठवणही कमी झाली.

आता रोजचच झाल होत
सकाळी सकाळी उठायच,
आणि ऑफिसला जायायच.

एके दिवशी बघीतलतर काय,
कंपनीत मुलाखत द्यायला आली होती ती,
आणि मुलाखत घ्‍यायलातर चंक्‍क मी.

मुलाखत ठेवली बाजुला
मुलाखतीला सोडून गेलो,
आणि कॉपी पिण्‍याच्‍या बहाण्‍याने
मस्‍त बाहेर आलो.

विचार केला कि,
हृदयावरच ओझ आज फेकूणच टाकू,
आज तीला मनातल सांगुनच टाकू.

शब्‍दा शब्‍दात विचारल
तुम्‍ही आता कोण कोण,
म्‍हणाली मला कळले नाही
तर स्‍पष्‍टच सांगीतल
तु आता एकटीच का दोन.

एकल्‍या बरोबरच तीने ते
वेड लावणारे हास्‍य केले,
तिच्‍या लाजलेल्‍या चेह-याने
माझ्या सर्व प्रश्‍नांचे उत्‍तर दीले.

मग मनाने घेतला पुढाकार
शब्‍दांनीही साथ दीले,
वेळ न वाया जाता
हृदय तीच्‍याजवळ मोकळ केले.

म्‍हणाली असाकसा रे तु.
हे दोन शब्‍द सांगण्‍यासाठी
किती वर्ष लावत होता,
कॉलेजमधेही मला
तुचतर आवडत होता.

अरे देवा काय ही तुझी
लीला दाखवली,
वर्षानु वर्ष दुर राहुन
शेवटी दोन हृदय मिळवली.



- विरा

केदार मेहेंदळे

very good..... ushira ka hoina tula ti milali tar.... bhagwan ke ghar me der hai... andher nahi. ;)

sylvieh309@gmail.com