एक ओढ

Started by ankush.sonavane, July 12, 2012, 11:15:04 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

            एक ओढ
का रे तू असा वागतोस माझ्याशी
एकनिष्ठ नव्हते  का  रे मी तुझ्याशी
तुझ्या  भेटीचे स्वप्न बाळगून होते उराशी
पण तुझे तर आगमन लांबवातच असायचं.

       माझं तर मन वेडावलेल  असायचं
       तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसायचं
       दूरवर कोठे दिसतोस का ते पहायचं
       पानवलेल्या  डोळ्यांनी खिडकीच दार बंद व्हायचं.

तुझ्या येण्याचा भास होतो
मी  धावत धावत बाहेर येते
सगळीकडे वेडावून पाहत राहते
तुझे मात्र हे रोजच होत
मन मात्र माझंच कोमजून जायचं.

        एकदा मला तुला भेटायचं आहे
        प्रेमाच्या वर्षावात  चिंब भिजायचं आहे
        तू तर मला भेटायाल येतच नाही
        खर तर तुझे माझ्यावर प्रेमच नाही.

मी मात्र वेडी तुझी वाट पाहत बसते
रात्र  दिवस तुझ्या स्वप्नात रमून जाते
तुझा  तो एक स्पर्श जेंव्हा अनुभवते
तेंव्हा तर सगळ्यांचीच  झोप मोड होते .

         पहाटे तू आला होतास मी झोपेत होते
        उघडताच डोळे मिठ्ठीत घेण्यास धावले होते
        कसं सांगू तुला आज किती आनंद झाला  होता
        तहानलेल्या जिवाला दिलासा मिळाला होता. 

सुरवात होताच वसंत ऋतूची ओढ लागते पावसाची
आठवण येते जुन्या क्षणाची स्पर्शून जाणाऱ्या थेंबाची
एक थेंब जेंव्हा अंगावरती पडतो
निराशालेल्या मनाला आनंदित करून जातो.
   
                                                   अंकुश सोनावणे

sylvieh309@gmail.com

need development, typeksha katha liha :'(