ए आय चा ट्रेंड

Started by Rushi.VilasRao, September 10, 2026, 12:23:56 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

एकविसाव्या शतकात आज जातोय आपण...
रोज नवीन टेक्नॉलॉजी वापरतोय आपण...
आज ए आय ने बनवून ९० च्या दशकांचा फोटो
छात्या ताणून फिरतायेत पोरी अन् पोर...
पण ९० च दशक थोड जगून तर बघ....
आज ऑनलाईन रमी आणि पबजी खेळत बसणाऱ्यांनो,
खो-खो कबड्डी भवरा विटी दांडू खेळून तर बघ....
दिवसभर विना मोबाईल राहून तर बघ...
व्हॉट्सॲप च्या जागी फाऊंटन पेन ने पत्र लिहून तर बघ...
पत्र तुला येणार म्हणून पोस्टमनच्या वाटेला डोळा लावून तर बघ....
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram @K.rushi_bhaijaan
पेजर भले ही नसेल आज...
राहिलाच एखादा नंबर लक्षात तर
लँडलाईन ने एक फोन लावून तर बघ....
आज नोकऱ्यांचे इंटरव्यू ऑनलाईन होतात...
पण ९० च्या दशकातील एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वर नाव नोंदवून,
ऑफिस च्या पायऱ्या झिजवून तर बघ....
लक्झरी लाईफस्टाईल नावाच्या मृगजळात अडकलेल्यांनो
गाठी भेटी होतील म्हणून गावाला कार्यक्रम ठेऊन तर बघ....
फास्टफुडच्या, चवीच्या नावाखाली अरबट चरबट खाणाऱ्यांनो,
एकदा खानावळीत डाळ कमी आणि पाणी जास्त असणार वरण भात खाऊन तर बघ...
एक गाडी असून ही एरवी नवीन नवीन गाड्या घेतात पोर...
पण स्वतःची सायकल किंवा एम ए टी नाही म्हणून बेस्ट चे धक्के खाऊन तर बघ...
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram @K.rushi_bhaijaan