बघ तो पाऊस आज पुन्हा आला आहे..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 15, 2012, 06:03:56 PM

Previous topic - Next topic
तो पाऊस आठवतो तुला
अचानक कोसळलेला

माझा हात तुझ्या हातात तु घट्ट धरलेला
आकाशाकडे पाहत तोंडात काही तरी पुटपुटलेला

मी मात्र तुझी हर एक अदा माझ्यात कोरलेला

तु ही विसरभोळी छत्री तुझी उशीरा काढतेस

मी तर पावसाचा आस्वाद घेत होतो
तु मग मला जवळ खेचत होती
भिजु नको सांगुन स्वत:च भिजत होती

तुला तर भिजायला खुप आवडायचे
मग भिजल्यावर माझ्याजवळ शिंकत बसायचे

त्या पावसात तु माझ्या मिठीत यायचे
आजुबाजुला न पाहता मला जवळ तु करायचे

मग लोक ही बघुन म्हणायचे बघा हे युगुल

तु ही मागे वळुन त्याकडे रागाने पाहणं

त्यांना राग दाखवत एका घरात आपण जायचे

केवढा हा पाउस निर्दयी सारखे त्यालाच तु ओरडायचे

भिजलेल्या पावसात तु मोहक दिसायची
अंग अंग तुझे शुभ्र पेहरावात दिवाना मला करायचे

मी फक्त तुला बघत रहायचो
मग हीम्मत करुन तुच मला बिलगायचे

आज अशी वेळ पुन्हा नाही येणार म्हणायचे

मी सतत जुन्या आठवणीत हरवलेलो असायचो

तुझे ओठ ओठांवर ठेवीत तुझ्यात
मज गुंतवायचे

तुला नेहमी समजायचे मी कुठे भरकटतो आहे

माझ्या सोन्या मी सोबत आहे सांगुन
श्वासांनी फुलवत मोहीत मज करायचे

पाउस थांबुन जातो मग खुप घाई करतेस

तु पुन्हा भेटशीलना म्हणत हसत घरी निघायचे

रात्री फोनवर रात्रभर बोलायचे
मी झोपलो तर ऐकतोय ना म्हणायची

माझी ही प्रेयसी  खरचं माझ्याचसाठी जगायची

बघ तो पाऊस आज पुन्हा आला आहे...!
-
© प्रशांत शिंदे