गोब-या गोब-या गालाची - बडबडगीत

Started by shashaank, July 16, 2012, 12:02:01 PM

Previous topic - Next topic

shashaank

गोब-या गोब-या गालाची - बडबडगीत

- पुरंदरे शशांक

गोब-या गोब-या गालाची
मस्त नकट्या नाकाची
एक भावली आहे कुठे
ही काय इथे इथे....

कुरळे कुरळे केस मऊ
कश्शी दिस्ते मनी माऊ
अस्स पिल्लू गोडुलं
घरात या मिळालं...

हस्ते गोड राणी कशी
खळी किती नाजुकशी
कोकरु एक मऊसं
रांगतंय जरा जरासं...

केदार मेहेंदळे

#1
छान छान  बडबड  गीते
मस्त  मस्त  मज्जेची
बाहुल्या, चिमण्या, कावळ्यांची
कोण  लिहिते  सांगा  अशी?
शशांकजी , शशांकजी

shashaank

प्रिय केदार,
अरे, तू ही छान कविता केलीस की - तालासुरात म्हणता येतीये अगदी.... यावरुन असे वाटते की तूही चांगल्या बालकविता करु शकशील की - बघ, प्रयत्न कर... (एक मित्रत्वाचा सल्ला)
तू आवर्जून माझ्या सर्व कविता व विशेषतः बालकविता नावाजतोस याकरता मनापासून धन्यवाद.
असेच प्रेम असूदे.....