पैसा येयून जर

Started by विक्रांत, July 16, 2012, 01:11:29 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

पैसा येवून जर
मी असेन तुला विसरणार
तू दिलेल्या बुद्धीने
अन संधीने
मिळालेल्या सुखभोगावर
स्वत:चाच   हक्क सांगत
असेन गर्वाने फुगणार
तर हे भगवन
दारिद्राचे वरदान देवून
मजवर कृपा कर


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे