जाता जाता

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 03:41:07 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

जाता जाता येवढच कर
शेवटच माझ एकुन जा
तुझ्याशीवाय जगता येइल
येवढ्या आठवणि देवुन जा
जाता जाता येवढच कर
वचने तुझी मोडुन जा
मी दीलेली वचने मात्र
तुझ्या सोबत घेवुन जा
जाता जाता येवढच कर
मनात मला ठेवुन जा
जाताना एकदाच फ़क्त
मिठीत मला घेवुन जा
जाता जाता येवढच कर
वळुन माघारी पाहु नको
मी नसेन तेव्हा जगात
आठवुन मला रडु नको
जाता जाता एवढच कर

विघ्नेश जोशी...

Pratikk


केदार मेहेंदळे