माझे द्वंद्व

Started by sudhanwa, July 18, 2012, 01:03:01 PM

Previous topic - Next topic

sudhanwa

राग -

बेल वाजली, दार उघडलं
आला होता साक्षात राग ....
दारावरचा पाहुणा म्हणून
घेतला त्याला घरात

गप्पाष्टकं जमली , मैफिल जमली
रागाशी मी मैत्री केली
कित्येक वर्ष सरून गेली
मैत्री आमची फुलून आली

बसलो होतो एकटा केव्हा
राग साथीला नव्हता जेव्हा
विचारांचा गोंधळ झाला तेव्हा
इतक्यात राग आला पुन्हा

काय झालय मला कळत नाही
चप्पलही माझी दारात नाही
दाराला माझ्या कडी नाही
तरीही घरी कोणी येत नाही

निराश होऊन बसलो होतो
फिरून आला राग
दारावरचा पाहुणा म्हणून
घेतला त्याला घरात...
                          ...माझे द्वंद्व

Sudhanwa

sudhanwa

Hello Everyone,
Please help me with the comments...
It's truly valuable for me  :)

-Sudhanwa

sylvieh309@gmail.com

maza raag aasa title chalala aasata

rag naka manu


sudhanwa

Hi,
its not about only 'me'..
anger is within all of us...at different levels
..that was the thought behind the name
Can you please elaborate why do you want to change the name to "maza raag"
It will be great if you share your thoughts..
- Sudhanwa