फ़ाटकी झोली

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 08:26:11 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

फ़ाटकी झोली शिवत नाही
पगार हातात उरत नाही
काय करु मज कलत नाही
सुईत धागा शिरत नाही

चादरी बदलुन पाहील्या मी
फ़ाटल्याशीवाय राहत नाही
ठीगल जोडली लुगड्याची मी
गरीबी त्यात झाकत नाही

विस्तव पेटतो हाड जळतात
खळगी त्याची भरत नाही
क्षमला विस्तव कधि जरी हा
निखारे कोणि देत नाही

काय वरुन एकतोस बाबा
पाझर तुला फ़ुटत नाही
इतक भरुन दीलस आता
फ़ाटकी झोली शीवत नाही

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे