‘मी’पण

Started by sudhanwa, July 19, 2012, 10:58:15 AM

Previous topic - Next topic

sudhanwa


देवातलं देवपण नाकारतोय मी येथे
निसर्गाला वंदन करतोय मी येथे
माझ्यातलं 'मी'पण जपतोय मी येथे

जातींवर बहिष्कार टाकलाय मी येथे
खाकीचा रंग उडवलाय मी येथे
राजकारणावर पाणी सोडलय मी येथे
माझ्यातलं मीपण जपलयं मी येथे

मुर्तीपुजेचा धिक्कार स्विकारला मी येथे
संस्कारांचा गाशा गुंडाळला मी येथे
समाजाची व्यसने कवटाळतो मी येथे
माझ्यातलं मीपण जपतोय मी येथे

गर्दीतलं वेगळेपण दाखवतोय मी येथे
वेगळेपणातलं एकटेपण भोगतोय मी येथे
भोगातलं दुःख पण मिरवतोय मी येथे
माझ्यातलं मीपण जपतोय मी येथे

नात्यांना नकार नाहीये माझा येथे
त्यांच्यातला गुंता डावलतोय मी येथे
एकट्यानेच प्रवास करतोय मी येथे
माझ्यातलं मीपण जपतोय मी येथे

                                       ....माझे द्वंद्व

-Sudhanwa
http://wordpress.com/#!/my-blogs/

sudhanwa

Hello Everyone,
Please help me with the comments...
It's truly valuable for me :)

-Sudhanwa

केदार मेहेंदळे

नात्यांना नकार नाहीये माझा येथे
त्यांच्यातला गुंता डावलतोय मी येथे
एकट्यानेच प्रवास करतोय मी येथे
माझ्यातलं मीपण जपतोय मी येथे


chan kavita

sudhanwa


sylvieh309@gmail.com

जातींवर बहिष्कार टाकलाय मी येथे
खाकीचा रंग उडवलाय मी येथे
राजकारणावर पाणी सोडलय मी येथे
माझ्यातलं मीपण जपलयं मी येथे


नात्यांना नकार नाहीये माझा येथे
त्यांच्यातला गुंता डावलतोय मी येथे
एकट्यानेच प्रवास करतोय मी येथे
माझ्यातलं मीपण जपतोय मी येथे


hi don kadawi chaan pan tu dwdat ka aasate nehami
::)

sudhanwa

I am glad you liked it...
-Sudhanwa

sudhanwa