ये रे ये रे पावसा

Started by gurjar.makarand, July 20, 2012, 12:32:13 PM

Previous topic - Next topic

gurjar.makarand

ये रे ये रे पावसा 
नभाकडे, डोळा लाऊन, बघतो आहे वाट.
मेघराजा,कधी होईल, बरसात दाट,....|| धृ||

जाण आहे,आम्हा आम्ही, केलेल्या चुकीची,
सुधारणेच्या नावाखाली, वृक्षतोड फुकाची,
मारून धोंडा पायी, केला, सवताचाच घात,
मेघराजा,कधी होईल, बरसात दाट,........||1||

पानी पानी , करत आहेत, जनलोक सारं,
अजून वाजलं, नाही तुझ्या, येण्याचं नगार,
घालून शीळ, दमला पावश्या, दे दयेची भीक
मेघराजा,कधी होईल, बरसात दाट,........||2||

बीजं सारी, जळून चालली, ऐक माझ्या राज्या,
मिळल का रं,भाकर पुढ, लेकराला माझ्या,
नको करू, आता आमचं, जगणं तू  बिकट,
मेघराजा,कधी होईल, बरसात दाट,........||3||

आकशातून सांडल जवा, भळा भळा पानी,
चिता विझल, दाटलेली, मनी काळजीची,
वाहील नदी, डोळा आमच्या, भरभरून काठ,
मेघराजा,कधी होईल, बरसात दाट,........||4||


                                                                        ------ मकरंद गुर्जर
                                   12-07-2012


केदार मेहेंदळे