¤ तू

Started by dhanaji, July 21, 2012, 06:08:08 PM

Previous topic - Next topic

dhanaji


लेक बहिण माता तू
कधी झालीस भार्या तू.
संसारी दरवळणाऱ्‍या
अत्तराचा फाया तू.

मातीमधले बीज तू
आकाशातील वीज तू.
तू ह्रदयातील आनंद
अश्रुंमधले द्वीज तू.

ओठावरला राग तू
मौनामधली जाग तू.
महिषासुरा भस्म करशी
ती नजरेतील आग तू.

श्वासामधला वेग तू
रक्ताचा आवेग तू.
शास्वत सत्य चिरंतन
सृष्टीवरली रेघ तू.

तृष्णा मोह छाया तू
मृगजळाची माया तू.
जन्म जन्म तुझ्याच ठायी
परी कठीण समजाया तू.

. . . शिवाजी सावंत.