ती नव्हतीच माझ्या नशिबात (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, July 22, 2012, 04:06:02 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

 

ती नव्हतीच माझ्या नशिबात

मला माहित होतं
ती माझ्या नशिबात नाही
पण तरी सुध्दा रोजच मी
तिच्या मागे धावत राही


सकाळी ६ वाजेचा क्लास तिचा
मी ५ वाजेशीच तयार व्हायचो
साडे ५ वाजेशी जावून रोज
रस्त्यात तिच्या थांबायचो


मग सोमोरून तिला येता पाहताच
डोक्यावरून हात फिरवायचो
अन तिचा इशारा मिळेपर्यंत
माझी रोजची सर्कस चालू ठेवायचो


एके दिवशी अचानकपणे
ती बघून माझ्याकडे हसली
हसत हसत मैत्रिणींशी   
गप्पा मारत निघून गेली


पण मला काही कळेना 
तिच्या मनातले सारे भाव
बघून फक्त हसत राही
रोजच रस्त्यात राव


मग शाळेत जावून तिला भेटावं
असा खंबीर विचार मी केला
अन इस्त्रीचे नवे कपडे घालून
तिच्या शाळेत तिला भेटायला गेला


तिला भेटल्यावर म्हणाली ती
शाळेच्या मागे भेट
मनातल्या मनात स्वतःला म्हणालो
आपण किती ग्रेट


शाळेमागे भेटल्यावर
ती मस्त मजेत बोलली
तिचे बोलणे एकूण
माझी स्मृतीच जणू गेली 
     
पण स्वतःला सांभाळत मी हि
साध्याच गप्पा मारल्या
पहिलंच प्रेम म्हणून बोलावं कसं
तर स्वतःच्याच बढाया मारल्या


अशा गप्पांसोबत   
गिफ्ट देणे चालू झाले
तिने स्वीकारताच गिफ्ट
जणू थंड वारे वाहू लागले


मग असाच एके दिवशी
मी लाल फुल तिला दिले 
ती लाल फुल नाकारत म्हणाली
मी तुला फक्त मित्र केले 


प्रेमाच्या नावाखाली
मला रोजच भेटत होती
रोज नवीन नवीन गिफ्ट गेऊन
मला फसवत होती


ती गेलीच मला सोडून
तरी मी तिला असाच पाहत होतो
ती नव्हतीच माझ्या नशिबात
तरी तिच्या मागे धावत होतो



कवी - कल्पेश देवरे 

   



       

केदार मेहेंदळे

kasli maitri an kay prem
sagle nuste manache khel
ti mazi valentine pan
tila vatato mi fakt friend......

mi praytn kartoy hi kavita lihaycha....

tumchi kavita awadli.


shankar jorvekar


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sylvieh309@gmail.com



Amol Deore

Shaleche Divas Athavale,,,,,,,, & Hi Kavita javal-Javal Mazya jivashi samanta thevate............


Kalpesh Deore