तुझ्या मिलनाची आस

Started by Jai dait, July 23, 2012, 02:12:45 PM

Previous topic - Next topic

Jai dait

तुझ्या मिलनाची आस..
त्यांच्या इतकीच खास
जशी क्षितिजाच्या येथे
धरती आणि आकाश

तुझ्या मिलनाची आस..
त्यातच मन उदास
डोळ्यांतून वाहे पाणी
नि चेह-यावर हासं

तुझ्या मिलनाची आस..
सोडवते सारे त्रास
काय नि किती सांगावे
सारे जातसी अस्तास

तुझ्या मिलनाची आस..
बस जगण्याचा भास
तूच यावं नि स्पर्शाव
मोकळा होऊ दे श्वास...