सोडुन जाते आई

Started by joshi.vighnesh, July 23, 2012, 03:41:57 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

देवाकडे जेव्हा निघुन जाते आई
तेव्हा कुठे शांत झोपुन जाते आई

नाती सांभाळताना जीवाच रान करते आई
जबाबदार्‍या सांभाळताना रात्र जागते आई

काळजाच्या तुकडयासाठी रक्ताच पाणी करते आई
पिलांना दोन घास भरवुन उपाशीच झोपते आई

सरनावरती आज अशी शांत झोपली आई
आयुष्यभर सुख्या लाकडासारखी जळली आई

विघ्नेश जोशी...


balaji ranvirkar


siddheshtendulkar