अंतयात्रा

Started by joshi.vighnesh, July 23, 2012, 03:54:02 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

अंत्ययात्रा...

कुणी कुणाचं नसत, जगाच्या पाठीवर
सावळीही सोडून जाते, अंधार पडल्यावर
काय आणल होत काय घेऊन जाणार
मातीच शरीर सार मातीत मिसळ्णार
असेल मनगटात ताकद तोवर
पाया भक्कम करा घराचा
घराचे वासेही डगमगू लागतील
हात-पाय गळून पडल्यावर
असतील पान झाडाला तोवर
वाटसरु ही येइल विसाव्याला
गळून पडतील पान तेव्हा
येइल लाकड सुकी तोडायला
असेल डोळ्यात प्राण तोवर प्रेम द्या
येथील प्रतेक माणसाला
चार माणस लागतील शेवटी
मेल्यावर अंतयात्रेला..

विघ्नेश जोशि...

केदार मेहेंदळे