चाल आणखी

Started by शिवाजी सांगळे, September 22, 2026, 09:16:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चाल आणखी

थांबलास का? चाल आणखी थोडे अंतर
आधी बोल एकावर,बोल दुसरे थोडे नंतर

हातचलाखी न् काय काय करतात कोणी
जादू करतो काळी,कुणी मारतो थोडे मंतर

पावलागणिक गाणे नवे,येथे नव्या पिढीचे
आमचेही चालू असते, मधेमधे थोडे जंतर

एआय असो वा आणखीन ते नवीन काही
वापरावे हटकून, जुनाट एखादे थोडे तंतर

आंदोलने भले नको न् नकोत कसले मोर्चे
अनुभवा तरी दिल्लीतले, थोडे जंतर-मंतर

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९