अवघड कविता

Started by sudhanwa, July 23, 2012, 11:41:07 PM

Previous topic - Next topic

sudhanwa

मित्रहो खालील कवितेत काही तथ्य नाही
एका डोळ्याने वाचा अन् दुज्या डोळ्याने सोडून द्या... ;)

अवघड कविता
अवघड कविता करणं एवढं अवघड नसतं
जड शब्द वापरून हे अलगद साधायच असतं

यमक जुळू द्यायच नसतं
काय लिहलयं ते कळू द्यायच नसतं
अर्थ लागलाच कुणाला तर मात्र आश्चर्यानं पहायच असतं

कविता वाचन हे गांभीर्याने करायचं असतं
श्रोत्यांकडे प्रत्येक शब्दानंतर बघायचं असतं
हातवारे अन् आवाजाचं गणित तेवढ जोरदार मांडायचं असतं

रसिकांच्या कुजबुजीला जळजळीत कटाक्ष द्यायचा असतो
पहिल्या ओळीतले झोपले तर बाहेरचा रस्ता दाखवायचा असतो
कुठ तान्हं पोर रडलं तर राग आपला आवरायचा असतो

एवढं सगळ जमवून आणायचं असतं
सोप्याचं अवघड करून दाखवायचं असतं
जड शब्द वापरून हे अलगद साधायच असतं
                                                        .....सुधन्वा
                                                   

केदार मेहेंदळे



mahesh2323