The Great Marketplace...

Started by shindemithil, July 26, 2012, 10:39:23 AM

Previous topic - Next topic

shindemithil

the great marketplace... कुठल्याही वाराचे वा सणांचे बंधन येथे नसते, जगातील कुठल्याही आर्थिक मंदीचा तसूभर हि फरक या बाजारावर होत नाही.. बाजारच म्हणावा लागेल,,,,  सारा बाजार मांडलाय, बाजार.... वकील घ्या, कुणी इंजीनीर घ्या.. डॉक्टर हवा का? मिळेल ना... सहा आकडी पगारवाला? की चार चाकी वाहन वाला? नोकरी वाली छोकरीही मिळेल येथे.. हवी असेल तर सारे घरकाम करणारीही मिळेल... शोधून तर पहा.. हुंड्याचा हंडा कमरेवर घेऊन उभी असलेलीही मिळेल... पाठीवर थाप पडते "अहो...... हुंडा काय म्हणता? आमच्यात रीतच आहे ही.." मेम्बारशीप हवी का? गोल्ड.. सिल्वर.. प्लाटीनम.. महिन्याला अडीचशे प्रोफाईल पाहता येतील,  आणि हो नंबर्स मात्र तीस जणांचेच मिळतील बरं का..  काकाच्या > मामाच्या > सुनेच्या > बहिणीची मुलगी हे नात किती जवळचा आहे हे याच बाजारात कळतं... डिमांड सप्लायचे सारे नियम येथे निकामी ठरतात.. हजारो criterias , हजारो अपेक्षा, अशी अनेक permutation  combinations पडताळून झाले की मग... "आम्ही कोण ठरवणारे? या गाठी तर तो विधाताच बांधतो.."
खरंच....
देवा तू बांधतोस का रे या गाठी...? या बाजारावर जर तुझे थोडेसेही नियंत्रण असेल तर एकच गोष्ट कर.. या बाजारात आमच्या मनाचा, विचारांचा, संस्कारांचा कधी लिलाव होऊन देऊ नकोस..


Ashiki Kadam