ऋतू हिरवा (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, July 30, 2012, 11:25:22 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


ऋतू हिरवा !

उन्हाळ्याच्या उन्हामुळे
मन फार अस्वस्थ होते
घामांच्या धरांनी
शरीरही ओले होते
अस्वस्थ मनामुळेच
खूप आळस येत होता
असल्या ह्या वातावरणाचा तर
सर्वांनाच त्रास होत होता

तितक्यात अचानक जोरदार
वर वाहत आला
अस्वस्थ मन आणि भिजलेल्या शरीरासाठी
गारवा घेऊन आला
अचानक बदलणाऱ्या वातावरणाने
सर्वच होते आनंदी
पाऊसात भिजण्याची मन हलके करण्याची
कोणीही सोडत नव्हतं संधी

खिडकीत उभे राहून पाऊसाची थेंबे झेलण्यात
एक वेगळाच आनंद होता
थेंबांसोबत तो थंड वारा
ह्रिदयाला दिलासा देत होता
वृक्षही त्या पाऊसामध्ये
हसत खेळत होते
पाउसाच्या त्या वाऱ्यासोबत
मजेत डौलत होते

पाना फुला झाडांवर
एक वेगळेच चैतन्य आले
ढगांचा कडकडाट व पाउसाच्या सुगंधाने
वसंत सारे फुलले
थंड असा गारवा सर्वांनाच हसवत होता
ऋतू हिरवा ऋतू हिरवा म्हणत पाऊस पडत होता

कवी - कल्पेश देवरे