तू चालत रहा (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, July 31, 2012, 10:19:35 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


तू चालत रहा

येतील अडथळे, येतील बाधा
मिळतील जुन्या रुढींच्या लाथा

साथ मग मिळेल एक एक करुनी
तू प्रत्येकाला भेटत रहा

तू चालत रहा !!४!!

रस्त्यात तुझ्या लोक हसतील
पाहून तुला अन चिडवतील

तू न पाहता कोनाहीकडे
फक्त नजर वाटेवर ठेवून रहा

तू चालत रहा !!४!!

घरच्यांचीही साथ न लाभेल
मित्रही काही तुटक बोलेल

तू ऐकत सारे
त्यांच्या जवळच रहा

तू चालत रहा !!४!!

आयुष्य विना ध्येयाचं
म्हणजे तीर विना निशान्याच

तू नुसताच न बोलता
कार्य पुर्णतेला लागून रहा

तू चालत रहा !!४!!

एक दिवस येईल तुझा
लोक समजेन तुला राजा

म्हणतील नशिबाने मिळाले सारं 
पण तू फक्त पाहत रहा   

तू चालत रहा !!४!!

कवी - कल्पेश देवरे

 



केदार मेहेंदळे



Kalpesh Deore

धन्यवाद......मी तुमच्या अपेक्षे पर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करीन.....

balaji ranvirkar