भेट ...त्याची नि मझी

Started by sai patil, July 31, 2012, 04:56:06 PM

Previous topic - Next topic

sai patil

किती तरी दिवसांनी तो मला भेटणार होता
त्या असह्य विरहाचा आता अंत होणार हॊता..

त्याला भेटण्यासाठी खुप अधीर मी झाले होते
खास त्याच्यासाठी तयार होवुन
त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते..

त्याच्या आठवणीत इतके दिवस काढले होते
पण आताचे हे काही क्षण खुपच मोठे वाटत होते

तो आला की त्याला डोळे भरुन पहायचं होतं
त्याच्या मिठीत शीरुन बाकी सगळं विसरायच होतं

इतक्यात त्याची येण्याची चाहुल लागली
आणि माझ्या ह्रदयाची स्पंदन वाढली..

पण बराच वेळ वाट पाहुनही तो तर आलाच नाही..
का आला नसेल तो हे काही मला कळलेच नही.

विसरला असेल तो मला....?
कि भेटायची ओढच राहिली नही त्याला?

वेळ जात होती तसं मनात शंका कुशंकांच काहुर माजत होतं..
त्याच्या आठवणीने ह्रदय अगदी व्याकुळ झालं होतं

संयमाचा बांध तुटून एक अश्रु माझ्या गालावरुन ओघळला..
इतक्यात अचानक त्याचा तो सुखावणारा स्पर्श झाला..

ऊशीर झाला येण्यास म्हणुन sorry म्हणाला..
मग त्याच्यावर रागवू तरी कशी..कारण आज
माझा तो प्रिय सखा 'पाऊस'
मनसोक्त बरसून..मला चिंब भिजवुन गेला...;-)

                                              -सई



sai patil

Hi mazi pahili kavita ahe....so very excited abt it..thank u so much 4 ur comments :)


shashaank


केदार मेहेंदळे



Nikita bhadarge

I really like it . Bec majhya life made hi asa c moment ala hota mi ata hi khup miss karte ani ya kavita khup sundar hoti so nice ...


Preetiii