गालातल हसू गालात (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, August 01, 2012, 02:54:58 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

गालातल हसू गालात

कोवळ्या तुझ्या नाजूक गालातून
स्मित कसे ग आलेत निघून

कसला ग हा तुला भास
विसरून गेलीस सर्वच त्रास

काय असे ग तुला दिसले
क्षितीज हर्ष्याने न्हाऊन निघाले

मोहक सौम्य ती तुझी लाज
अंतरंगात देते चैतन्य आज

आहेत मनात विचार दंग
क्षणार्धात बदलतेस तू किती रंग

कोपऱ्यात मनाच्या दुखः अफाट
मन समुद्रात येते आशेची लाट

वेळेच्या बांधत डांबलीस
क्षीण स्वतः तू कशी झालीस

बदलत रहा तू ऋतू सारखी
उन, पाऊस अन थंडी सारखी

दुसऱ्यांची ती सोड आस्था
क्षणात दिसेल तुज दिव्य रस्ता

पसरू दे ते हर्ष मनात
जशी चांदणे दिसतात नभात

कवी – कल्पेश देवरे