ढग ! (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, August 01, 2012, 03:24:06 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

ढग !

उन्हाळयातलं उन भिजवते मनाला
बाष्प समुद्राचे मिळते नभाला

सुरु होतो प्रवास मग हवे संग त्याचा
चालता चालता त्याच्याही दुखतात हो टाचा

रम्य संध्या सारुनी रात्रीचा होतो उगम
चांदण्याच्या प्रकाशात तोही करतो चमचम

चंद्र त्याच्या आड लपुनी लपाछपी खेळतो
रात्र सरता सरता त्याला चांदण्यांसह हसवतो

सकाळच्या कोवळ्या किरणांनी सूर्य स्वागत करतो
क्षणाक्षणाला मग त्याची तो अग्नी परीक्षा घेतो

भास्कराच्या क्रोधाने सगळा निसर्ग सुखवून जातो
हे जणू त्याला दिसताच क्षणी तो रिमझिम होऊनी बरसतो

कवी – कल्पेश देवरे

केदार मेहेंदळे

#1
kya bat.... kya bat...

chan kavita