हि प्रीत कशी झाली

Started by SANJAY M NIKUMBH, August 02, 2012, 08:51:06 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू काय न मी काय
फक्त भेट आपली घडली
म्हणून मनात थोडीच
प्रीत आपल्या उमलली
अशा कितीतरी भेटी
घडत असतात जीवनात
कुणी येत कुणी जात
किती तरी आयुष्यात
कुणी आवडून जात
कुणी सखा होऊन जात
पुसटशी भावना होते प्रेमाची
तरी मन मागे फिरून जात
फक्त तुझ्या न माझ्या बाबतीत
असं घडलं नाही
किती सावरलं मनाला
तरी ते सावरलं नाही
तुला काय वाटत 
हि प्रीत कशी झाली
मला इतकच वाटत
देवान ती फुलवली 
देवाचा स्पर्श होता
सखे आपल्या प्रीतीला
म्हणून अडवू शकलो नाही
आपण नियतीला .