नसानसात तुझ प्रेम वाहतंय

Started by SANJAY M NIKUMBH, August 03, 2012, 07:28:53 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेम हा शब्द
ठाऊक होता
पण त्याची बाराखडी
तू मला शिकवली
आपल्या सहवासात 
नकळत आलेले काही धुंद क्षण
हेच प्रेम आहे हि बाब
तू माझ्या मनावर बिंबवली
मी तर पाखरू होऊन
तुझ्या अवतीभवती घुटमळत होता
पण तुझा प्रत्येक श्वास
मला तुझ्यात गुंतवत होता
तू अबोल राहूनच
सारे खेळ खेळत होती
फासे टाकून भावनांचे
मला जाळ्यात ओढत होती
जेव्हा करत होतो प्रयत्न
मी दूर जाण्याचा
तेव्हा साद घालून
तुझ्याकडे खेचत होती
तुझे डोळे न सुंदर कुरळे केस
होतेच तुझ्या सोबतीला
पण तुझं निरागस मन
भुरळ पाडून गेलं माझ्या मनाला
आता नसानसात
तुझ प्रेम वाहतंय
त्या प्रेमसागरात डुंबून
मन बेधुंद होऊन जगतंय.