तू आलीस न जगण बदलल

Started by SANJAY M NIKUMBH, August 04, 2012, 06:23:01 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू आली आयुष्यात
मन रविच झालं
मलाही कळलं नाही
कधी ते कवीच  झालं
दिवसा ढवळ्या तुझं
स्वप्न पाहू लागलं
रात्रीही तुला स्वप्नात
घेऊन फिरू लागलं
एकट असतांनाहि
वेड्यासारखं हसू लागलं
बेधुंद होऊन आयुष्य
मन जगू लागलं
केव्हाही उमलून शब्द
कविता करू लागलं
त्या प्रत्येक शब्दाशब्दात
तुला पाहू लागलं
इतकं कसं तुझं 
मला वेड लागलं
तू आली आयुष्यात
न जगणंच बदलून गेलं.