"अंकल ये रस्ता किधर जाता है " .

Started by हर्षद कुंभार, August 04, 2012, 10:58:22 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

                    फार जुनी घडलेली ही सत्य घटना आहे. तेव्हा मी नुकतीच विज्ञान शाखेची पदवीधर परीक्षा दिली होती. आणि सुट्टीचा काळ होता. लग्न सोहळा म्हंटले की काय धाम धूम असते तुम्हाला माहीतच आहे. आणि तेव्हा आमच्या घरात पहिलेच लग्न माझ्या मोठ्या भावाचे ठरले होते. मी त्या वेळेस साहजिकच खूप खुश होतो. तेव्हा माझ्या घराचे सगळे पुढे गावाला लग्नाच्या तयारीला गेले होते . मी आणि माझ्या मावस भाऊ दोघे नंतर जाणार होतो.
                तर मी माझ्या मित्रांना पत्रिका देण्याचे काम चालू केले होते. बरीचशी झाली होती देयची, आता फक्त एक मित्र जो जरा लांब राहायला होता. म्हंटले त्याला शेवटली देऊ. म्हणून त्या लांब राहणाऱ्या मित्राला पत्रिका देयचे ठरले. त्यावेळेस मोबाइल आमच्या एकाही मित्राकडे नव्हता त्यामुळे संवाद साधायला काही साधन नव्हते.
                 त्या मित्राकडे मी एकदाच गेलो असल्याने फारसे काही लक्षात राहिले नाही कुठून कसे जायचे ते. आणि त्या मित्राकडे जायला फार गल्ली-बोळ असे पार करून जायला लागते. तेव्हा संभ्रमात असे काहीच लक्षात राहिले नाही.
                 मी अन माझा मावस भाऊ दोघे संध्याकाळी त्याच्याकडे जायला निघालो. तेव्हा ५-६ वाजले असतील आणि आम्ही त्या मित्राच्या घराजवळ
गेलो तेव्हा ७ वगैरे झालें असतील. आम्ही दोघे कधी या बोळातून तर कधी त्या गल्लीतून जात होतो पण ओळखीचे असे काहीच दिसत नव्हते.
                   माझा भाऊ मला शिव्या घालत होता की कुठे कुठे फिरवतोय म्हणून , तो आणि दोघही खूप वैतागलो होतो. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही एका बोळात गेलो तिथे खूप अंधार होता आणि एक इसम इथे त्याच्या घराच्या उंबऱ्यात बसला होता.  पुढे अंधार असल्याने मी त्या इसमाला  विचारले "अंकल ये रस्ता किधर जाता है " .
                  त्या अंकल ने जे उत्तर दिले त्याने आम्ही दोघे जे काही हसत हसत तिथून पलायन केले की.  कारण ते अंकल काय म्हणाले माहितेय "ये रस्ता हमारी मोरी में जाता है.". त्याने आम्हाला काय समजले देव जाणे पण शिव्या घालत होता. मग आम्ही तिथून पळ काढणे भाग होते.
                   भाऊ कंटाळून शेवटी म्हणाला जाऊदे ना यार , चल जाऊ घरी. मीपण म्हंटले ठीक आहे चल करून तिथून निघालो आणि समोर त्या मित्राचाच लहान भाऊ दिसला. काय सांगू तेव्हा इतके हायसे वाटले ना काय सांगू, सरते शेवटी त्याच्या घरी गेलो घडलेला सगळा प्रकार सांगितला. एकदम सगळीकडे हशा पिकली.  त्याला पत्रिका दिली आणि निघालो घरी जाई पर्यंत आम्ही दोघे सारखे हसत होतो त्या अंकलला आणि त्याच्या त्या वाक्याला आठवून. -  हर्षद कुंभार