प्रेम असचं करायला हवं

Started by SANJAY M NIKUMBH, August 06, 2012, 06:34:05 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

श्वासाला गरज असते
फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची
जगण्याला गरज असते
फक्त पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची
प्रेमाला गरज असते
त्याच्या अस्तित्वाची
नव्हे वारंवार भेटण्याची
ना पाहण्याची
प्रेम असचं करायला हवं
कि गरजच उरणार नाही
तिला पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची.

केदार मेहेंदळे









vijay pawar