माझं जगण

Started by SANJAY M NIKUMBH, August 06, 2012, 07:46:20 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

जग झोपी जात तेव्हा
माझं जगणं सुरु होत
तुला सोबत घेऊन
माझं भटकण सुरु होत
रातराणीच्या गंधाचहि
तेव्हाच दरवळण होत
नभातल्या चांदण्याचही
तेव्हाच हसणं सुरु होत
मिटतो जरी पापण्या
माझं जागण सुरु होत
डोळे भरून तुला
माझं पाहण सुरु होत
तुझा गंध श्वासात
भरून घेण सुरु होत
नसानसात तुझं
झिरपण सुरु होत
जेव्हा होते पहाट
तुझं जगण सुरु होत
माझं अस्तित्व तेव्हा
नामशेष होऊन जात


PRATIK GIRI


Avinash Potdar

MAZ ZAGAN....................