प्रेम

Started by SATISHGAVHALE1970, August 06, 2012, 07:50:49 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

प्रेम
ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते

माळले प्रत्येक फुल
सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण
फक्त प्रेमानेच भारले होते

डोळ्यात पाणी तुझ्या
मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू
सारे जीवन हसले होते

अवचित आवडलेली तू
जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली
माझे मलाच कळले नव्हते – सतीश लक्ष्मण गव्हाळे



केदार मेहेंदळे


rajendra nikam


d.s.bobade

खुप सुंदर