म्हातारा”

Started by SATISHGAVHALE1970, August 06, 2012, 07:55:22 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

"म्हातारा"
मिठ मसाला लाऊन तळलेले मासे
काटे काढून खाण्याचा
प्रयत्न कधी जमलाच नाही
कुठेतरी कधीतरी
एखादा काटा खुपय्चाच
मेलेल्या माश्याची
कधीतरी महात्म्याची
असाच आठवण करून जायचा
तलम कापडाच्या सुटात
कधी सुटसुटीत वाटलेच नाही   
सुत कातत बसलेंला
एक म्हातारा नेहमीच दिसायचा
सिनेमा पाहायला जाण्यासाठी
खोट बोलण्याची
त्यादिवशी सुद्धा  इच्छा झाली होती
चष्म्यातून त्याची नजर रोखालेलीच होती
मारामारी करायला
हात नेहमीच शिवशिवत होते
लहान बाळासारखे निर्व्याज हसत
अहिंसेचे पाठ म्हाताऱ्याचे चालूच होते    -  सतीश लक्ष्मण गव्हाळे

केदार मेहेंदळे