आर पार

Started by SATISHGAVHALE1970, August 06, 2012, 07:56:28 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

आर पार
प्रत्येक वळणावर रस्ता
एक प्रश्न विचारात होता
मिटवून जुन्या पाऊलखुणा
पुढे जाण्यास खुणावत होता


प्रत्येक रात्रीनंतर
सुर्योदय ठरलेलाच होता
खोल अंधाऱ्या रात्रीतच
उषःकाल लपला होता

येणारे प्रत्येक दुःख
फक्त आशेचे किरण होते
भावी सुखाच्या प्रतीक्षेत
स्वागताला दारी उभे होते

प्रत्येक अस्तित्वाला
एक आर पार होता
मध्य शोधता शोधता
खेळ
जीवन मृत्यूचा रंगला होता.   – सतीश लक्ष्मण गव्हाळे









केदार मेहेंदळे

प्रत्येक अस्तित्वाला
एक आर पार होता
मध्य शोधता शोधता
खेळ
जीवन मृत्यूचा रंगला होता.

chan..