मी वाट पहातोय

Started by SANJAY M NIKUMBH, August 06, 2012, 08:16:12 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

धरतीनही पावसाची इतकी
वाट बघितली  नसेल
नभानही चांदण्यांची इतकी
वाट बघितली नसेल
सागरानही नदीची इतकी
वाट बघितली नसेल
झाडानही पानांची इतकी
वाट बघितली नसेल
बदलणाऱ्या ऋतुचीही निसर्गानं इतकी
वाट बघितली नसेल
अंधारानही प्रकाशाची इतकी 
वाट बघितली नसेल
रात्रीनही पहाटेची  इतकी
वाट बघितली नसेल
देवानही भक्ताला इतकी
वाट पाहायला लावली नसेल
तितकी तुझ्या प्रेमाची वाट
मी युगानयुगे पहात आहे
तू कधीतरी होशील माझी
हि आशा बाळगून इतकी  कुणी
वाट बघितली नसेल