तू ही वेडी आहेस

Started by SANJAY M NIKUMBH, August 06, 2012, 08:36:32 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू वेडा आहेस
हे तुझे शब्द
ऐकण्यास किती गोड वाटतात
पुन्हा पुन्हा तू म्हणावस
असं वाटून मनास
कानही किती आतुर होतात
त्या शब्दातला गोडवा
त्यातला अल्लडपणा
माझ्या मनास वेड लावतात 
ब्रम्हांड दिसत तुझ्या चेहऱ्यात
जेव्हा तुझ्या पाकळ्या
बोलण्यासाठी उमलतात
तेव्हा तुझी झुकलेली नजर
तुझ्या मनातली प्रीत
मला सांगून जाते
तू ही वेडी आहेस
माझ्या हृदयास
न सांगता कळून जाते 

केदार मेहेंदळे