तुझा गंध

Started by SANJAY M NIKUMBH, August 06, 2012, 10:24:46 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

माझ्या अंतर्मनात सतत
तुझं अस्तित्व जाणवत
श्वासात तुझ्या गंधाच
दरवळण सुरु असत
तो गंधच मला निजवतो
तोच मला उठवतो
प्रत्येक क्षणात तुला
तोच मला भेटवतो
तुझ्या दुराव्याचा तर
मनी विचारही नसतो
तुझ्याशिवाय कुठलही
स्वप्न पहात नसतो
तुझं हे अस्तिवच
मला बेधुंद जगवत
तू दूर आहेस
हे हि मन विसरून जात
   

केदार मेहेंदळे


PRATIK GIRI


kavitapremi65