माझी कविता तू वाच

Started by केदार मेहेंदळे, August 07, 2012, 11:04:48 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

प्रिय मित्र विक्रांत,
तू लिहिलेली "माझी कविता तू वाच" हि कविता वाचली. त्या कवितेला एक मित्र म्हणून हे माझं उत्तर. मला खात्री आहे कि तुला हे उत्तर नक्की पटेल आणि आवडेल हि.


माझी  कविता तू वाचं
तुझी कविता मी वाचतो
तू मला छान म्हण
मी तुला छान म्हणतो

रद्दी असेल तरच कविता
ओरडून विकायला लागते
चांगली असेल कविता तर
न ओरडताच सगळ्याना आवडते

असतीलही बाल भारतीत
फालतू काही कविता,
तिथेच होती ना वाचली
लाडक्या भावलीची कविता!

खरं तर कवीची वहीच काय ती
नशीब मात्र फाटके नसते
मार्केटिंग शिवायही चाहत्यांची
त्याला काहीच कमी नसते

गरज असते ती फक्त
चाहत्यां पर्यंत पोहचण्याची
पुस्तकात जागा मिळवण्या पेक्षा
चाहत्यांच्या मनात घर करण्याची

आपण तरी वाचतो का रे
न आवडणारे ग्रंथ कधी?
मग का ठेवायची अपेक्षा
सगळ्याना कविता आवडण्याची?

सगळ्याच्या कवितेत
वेगळे काय असते? खरे आहे....
संगीतात तरी सात सुरांच्या
पल्याड काय असते? सांग ना रे....

पाउस, प्रेम, पक्षी सगळे
बाराखडीतच बसवायचे असते
शब्द अन वाक्यांच्या रचनेत मात्र
नाविन्य आणायचे असते.

तुला मला सगळे जरी
माहित आहे हे
दुखावलायस मित्रा कशावरून तरी
म्हणून बोलतोयस हे

दुसर्यांची कविता आवडो न आवडो
वाहावाचा धुरळा उडवायचा असतो
ह्या धुरळ्यातूनच नाही का मित्रा
कवितांचा जन्म होणार असतो

कवींनी कविता करत राहावं
नवनवीन कल्पना मांडत राहावं
पुस्तक, छपाई, प्रसिध्धी पेक्षा
नवं-निर्मितीचा आनंद मिळवत राहावं

म्हणून म्हणतो, पुन्हा सांगतो
माझी कविता तू अन तुझी मी वाचतो
तू मला छान म्हण
मी तुला छान म्हणतो

:) :) :) :) :) :) :) :) :) :)



केदार....


विक्रांत

केदार,
तुझ्या   कवितेला  छान  म्हटल्या  शिवाय  गत्यंतर  नाही  .
तू  कवी  आहेस  चांगला  अन  मन कवडाही  आहेस

प्याला  अर्धा  भरलेला  असतो  अर्धा  रिकामा  असतो
तरीही कुणी  भरलेला  म्हणतो  कुणी  रिकामा  म्हणतो 

तू  भरलेला  दाखिवलास  मी  रिकामा  म्हणत   होतो 
इलाज  नाही त्याला  कवीचा  मूड  मोठा  अजब  असतो

म्हणूनच तो कवी असतो

विक्रांत