प्रेमात पडतांना

Started by SANJAY M NIKUMBH, August 07, 2012, 10:12:04 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी गुलामी स्वीकारलीय
तुझ्या हृदयाची
तुझ्या प्रेमाची
कळत होत मला
तुझा गुलाम होतांना
पण भान हरवत होत
तुझ्या डोळ्यात पाहतांना
आवडत नव्हत मला अस घडतांना
पण तुझ वेड लागत होत
तुला भेटतांना
तुझे सुंदर डोळे
न भुललो कुरळ्या केसांना
तुझ्या चांगल्या स्वभावान
जोडलं हृदयाच्या तारांना
कधी जुळल नात
कळल नाही मनांना
सावरल होत दोघांनीही
प्रेमात पडतांना
पण नियतीच्या मनात
वेगळच काही होत
मी तुझा गुलाम होईल
हे स्वप्न कुठे पडलं होत . 

केदार मेहेंदळे