प्रेम आंधळ नसतं

Started by SANJAY M NIKUMBH, August 08, 2012, 08:30:17 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेम आंधळ नसतं
प्रेम कधीच आंधळ नव्हत
कुणी दचकल तर कुणी उडाल असेल
पण मी अनुभवान सांगतो
प्रेम आंधळ नसतं
अख्ख जग त्याला आंधळ म्हणत असत
पण दिसत तसं नसतं  प्रेम आंधळ नसतं
कारण कुणीही उठसुठ प्रेमात पडत नसतं
कुणाच्याही आयुष्यात प्रेम येत  नसतं 
काहीतरी भावत मनास उगीच धावत नसतं
काहीतरी दिसत वेगळ म्हणून वेड लागत असत
कुणाच प्रेम होत सुंदर चेहऱ्यावर
तर कुणी मरत त्याच्या मनावर
कुणाला वेड लागत स्वभावाच न हुशारीच
तर कुणाला लागत चांगल्या वागण्याच
म्हणजेच प्रेमाला काहीतरी दिसत
उगीच मन कुणात थोडं फसतं
मग जग कसं म्हणत
प्रेम आंधळ असत
आंधळ असत ते मन न त्यावरचा विश्वास
तो विश्वास तुटल्यावर प्रेम आंधळ वाटत
पण ते फक्त माणसाच्या कर्माच फलित असत
मुळात जो घाव घालतो विश्वासावर
त्याच्या मनातच प्रेम नसतं
किंवा जो जातो प्रेमाला सोडून
त्याला प्रेमच  कळलेलं नसतं
प्रेम म्हणजे स्वार्थ किंवा आकर्षण नसतं
प्रेम म्हणजे मिळवण नव्हे तर देणं असत
विश्वासान बांधलेलं ते सुंदर लेणं असत
प्रेम वय जात धर्म काहीच पहात नसतं
ते फक्त दुसऱ्या मनातल प्रेम पहात असत
मनातल्या आरशात डोकावल्यावर आपलं प्रेम कळत
पण ते न बघता मन नुसतच धावत सुटत
प्रेम भोगात नाही तर त्यागात आहे 
ज्याच्यावर प्रेम झालं त्याचच जगणं  होऊन जात
कुणी विचारच करत नाही म्हणून तसं वाटत
प्रेम सुंदरच असत प्रेम आंधळ नसतं
कुणी प्रेमात पडलच तर ते तावून सुलाखून घ्याव
प्रेमानच दोघांचही जगणं समृद्ध कराव .     




Sandesh More



rajoo shirke

वा, प्रेमावरचा एक निबंध वाचायला लावलात याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.


Kiran Mandake

 :) maralas ekdam..............khup khup khupach chhan..............................

rc.rahul

कुणाला वेड लागत स्वभावाच न हुशारीच
तर कुणाला लागत चांगल्या वागण्याच
म्हणजेच प्रेमाला काहीतरी दिसत......... Khup Chan ...


प्रशांत नागरगोजे

सही कविता...खऱ्या प्रेमाचा अर्थ. :)