नकोस वाटत

Started by Somnath pisal, August 09, 2012, 07:22:38 PM

Previous topic - Next topic

Somnath pisal

नकोस वाटत हे जीवन
नकोसा वाटतो हा बहरलेला डोंगरमाथा
नकोसी वाटती हि मानवी भावना
नकोस वाटतं प्रेमात समरस होणं आणि प्रेम निभावणं
नकोस वाटत जगाच्या ईच्छेनुसार जीवन जगणं
नकोस वाटत साद दिली तरी प्रतिसाद देणं
नकोस वाटत भावविवश होवून जीवन संपवणं
नकोस वाटत दररोजच थोडं थोडं मरणं
संपवून टाकावे एकदाचे सगळे प्रश्न -उत्तर   
                               
                                               somnath pisal

केदार मेहेंदळे

पण का?

छान तर आहे हे जीवन
किती दिसतो छान हा बहरलेला डोंगर
कोमल किती ह्या मानवी भावना
किती असतं छान प्रेमात समरस होणं, अन प्रेम निभावणं
चांगलं असतं दुसर्यांच्या हवाली आपलं आयुष करणं
चांगलं असतं साद दिली कि प्रतिसाद देणं
छान असतं भाव विवषेत जीवन जगणं
कशाला उगाच रोज थोड थोड मारणं?
चांगले असतात सगळे प्रश्न.......
अन त्याची उत्तर.