मी कसा पाहू कुठे ?

Started by SANJAY M NIKUMBH, August 09, 2012, 08:00:14 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू मला सांगतेस
हि गवताची पानं किती छान डोलतात
हि झाडांची फुल किती गोड हसतात
या रिमझिम पावसाच्या सरी वेड लावतात
उडतांना पक्षांचे पंख किती छान दिसतात
तू मला दावतेस
त्या दूरवरच्या क्षितिजावर झुकलेलं आभाळ
त्या निळ्याशार पाण्यावर तरंगणारी लाट
सुर्यास्ताच गुलाबी रूप त्या नभातल
परतणाऱ्या पक्षांचे थवे आकाशात
तू मला म्हणतेस
हे निसर्गाचं रूप किती मनमोहक
तुला काय आवडत तू मला सांग नां
मी म्हटलं
तुझ्या चेहऱ्याइतक सौंदर्य कशातही दिसत नाही
मी कसा पाहू कुठे ?
तुझ्या चेहऱ्यावरून नजरही हटत नाही.

केदार मेहेंदळे