तो काळ होता...!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 12, 2012, 01:35:39 PM

Previous topic - Next topic
आयुष्यभर दु:खच पाहीलेल्या  स्त्रीचे दु:ख
थोडं मांडतोय...

मी आले माझा जन्मच वेगळा
डोळे उघडण्याआधीच अंधाराने गाठले
तो काळ आला होता
पण माझा जन्मच लढायाचा
मी काळाशीही लढले..

पाऊस पडत होता
सारे वाहुन नेले
होते नव्हते हिरावले
मज पोरके केले
माझ्यासाठी आलेला तो
नात्यांनाही घेऊन गेला होता
तो काळ आला होता

जगले कशीतरी
मग भेटले कुणी प्रेम देणारे
मधुमिलनात मिठीत त्यांच्या मी होते
आयुष्यभराचे दु:ख मला विसरायचे होते
खुपच हर्षात न्हाहत होते
पण..
हयांना सोबत घेउन गेला
कुंकूने सजलेलं भाल माझे उजाडुन गेला
तो हसत होता
तो काळ आला होता..

चार क्षण सुखाचे पाहताना
मला न्यावयास तो काळ आला होता..
-
© प्रशांत शिंदे