परिघ

Started by शिवाजी सांगळे, October 22, 2026, 08:18:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

परिघ

बोटांवर नाचवावेत
वजीर, हत्ती, घोडे, उंट!
इतकंच काय, राजा सुध्दा
नाचवता येतो आजकाल...
पण एक गोष्ट लक्षात ठेव
अगदी योग्य असावी तुझी चाल...
मग पहा, कसा नूर बदलतो
सर्वच, नाटकी सत्ताधाऱ्यांचा
अरे, हिच तर कमाल आहे
एका योग्य चावीची...
अन् हो, सवय हवी तुला
एवढी सारी जनावरं?
बोटांवर नाचवायची...
भल्याभल्यांचे होते बाहुले
असल्या वर्तुळात...
नाक तोंड दाबून
घ्यावा लागतो श्वास
जगताना त्या परिघात...

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९