तिचा दुरावा

Started by Tejas khachane, August 13, 2012, 05:37:17 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

 दूर जाण्याआधी एकदा वाड्यावर्ती येऊन जा
छिन्न विच्छिन्न हृदय माझे एकदा तरी पाहून जा
आधी  होते मन सुगंधी
ओठांवरती मधुर गाणी
आता मात्र विच्छिन्न हृदय आणी
डोळ्यात फक्त पाणी
सर्वांच्याच आयुष्यात असा कठीण प्रसंग का यावा
हसत्या खेळत्या जीवनाचा जणू आनंदच हिरावून न्यावा
आठवतात जेवा आठवणी
तेव्हा वदना होतात कोटी
निमूट पाने सहन करावी , आली आहेत म्हणून वाटी
जेव्हा सूर्य मावळतो , होऊ लागतो अंधार
नेहमी प्रमाणे वाटते आजही तू भेटणार
हताश होऊन लक्षात येते तू तर माझी आता नाही
राहिल्या फक्त आठवणी आता कोणी नाही वाली
विहाराचा दाट अग्नीत होर्पडून आपण गेलो
सांगितले तरी पटणार नाही ,
आपण किती विष प्यालो
दिवस जातील वर्ष जातील ,
जीवही जायला येईल
पण खर्च सांगतो प्रिये आठवण तुझीच येत राहील.




तेजस