ती

Started by SATISHGAVHALE1970, August 14, 2012, 07:57:12 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

ती
"मी सुंदर दिसत नाही"
अस तिला उगाचच वाटायचं
""आजच्या पेक्षा काल जास्त सुंदर दिसत होतीस"
हे हि तिला खरच वाटायचं

गुलाबाने गुलाबासारखे असायला हवे
जाई-जुई व्हायचं त्याने टाळायला हवे
गुलाबही सुंदर असते
जुहीही छान हसते
कुणी तरी तिला हे सांगायला हवे

अग वेडे सुंदर दिसायचं नसत
सुंदर असायच असत
काटे असले तरी
गुलाबाने गुलाबासारख जगायचं असत – सतीश लक्ष्मण गव्हाळे

केदार मेहेंदळे

mala vatat hi prernatmak kavyat post vhayla havi. :)

punamdatere

mala tumche vichar khup khup avadle