शिकवं थोडं मलाही

Started by SANJAY M NIKUMBH, August 16, 2012, 07:54:03 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

शिकवं थोडं मलाही 
प्रेम व्यक्त कसं करावं 
अबोल राहूनही
डोळ्यांनी कसं बोलावं
गुंतूनही मनानं
गुंतणार नाही कसं सांगाव
न पाठ फिरल्यावर
साद कशी  घालावं   
फक्त एका कटाक्षान
वेड कसं लावावं
हळूच गोड हसून
मनास कसं फसवाव
न बोलता कुणाच
हृदय कसं जिंकाव
चोर पावलांनी
हृदयात कसं शिराव
कुणाला वेड लावून
त्यास कसं झुरवाव
कुणी प्रेमात डुंबल्यावर
आयुष्यातून  कसं निघावं.   
   

NIKHIL CHOPADE

प्रेम प्रेम म्हणजे. . . . . . . .