सांग ! कसं जगायचं.

Started by SANJAY M NIKUMBH, August 18, 2012, 07:17:37 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुला वाटत मी
तुझ्या डोळ्यात बघायचं
एकटक पाहून
माझ भान हरवायचं
भान हरवून मनाला
वेड लागून गेल्यावर
सांग तुझ्यापासून मी
दूर कसं रहायचं
एकतर तुझे डोळेच
मला वेड लावतात
मी पापण्या मिटल्या तरी
मला ते खुणावतात
त्यांनीच शिकवलं मला
तुझ्यात कसं गुंतायचं
एकदा गुंतल्यावर मनानं
दूर कसं रहायचं 
तुझे लांबसडक केस
मला जाळ्यात ओढतात
तू घालतेस अंबाडा
ते मनास गुंतवतात
तुला बरोब्बर ठाऊक आहे
मला कसं गुंडाळायच
पण मन तुझं झाल्यावर
दूर कसं रहायचं
एकतर प्रेमाच्या भानगडीत
मला नव्हत पडायचं
कुणी सांगितलं होत
स्वतःच हृदय हरवायचं
पण तुझं हृदय भेटलं
न जगणंच बदलून गेलं
आता हृदय गेलं कामातून
सांग ! कसं जगायचं. 




mvd76


praful ghodke

[तुला वाटत मी
तुझ्या डोळ्यात बघायचं
एकटक पाहून
माझ भान हरवायचं
भान हरवून मनाला
वेड लागून गेल्यावर
सांग तुझ्यापासून मी
दूर कसं रहायचं
एकतर तुझे डोळेच
मला वेड लावतात
मी पापण्या मिटल्या तरी
मला ते खुणावतात
त्यांनीच शिकवलं मला
तुझ्यात कसं गुंतायचं
एकदा गुंतल्यावर मनानं
दूर कसं रहायचं 
तुझे लांबसडक केस
मला जाळ्यात ओढतात
तू घालतेस अंबाडा
ते मनास गुंतवतात
तुला बरोब्बर ठाऊक आहे
मला कसं गुंडाळायच
पण मन तुझं झाल्यावर
दूर कसं रहायचं
एकतर प्रेमाच्या भानगडीत
मला नव्हत पडायचं
कुणी सांगितलं होत
स्वतःच हृदय हरवायचं
पण तुझं हृदय भेटलं
न जगणंच बदलून गेलं
आता हृदय गेलं कामातून
सांग ! कसं जगायचं. PRAFUL..