तू नाद लावलास

Started by SANJAY M NIKUMBH, August 18, 2012, 07:50:26 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

व्हायचं ते होऊन गेलं
घडायचं ते घडून गेलं
कळत नाही कसं पण
मन प्रेमात पडून गेलं
कळलं नाही मलाही
कधी हातून निसटून गेलं
तू भेटलीस अन
मला सोडून गेलं
कधी तुझ्या डोळ्यांत
मन हरवत गेलं
कधी तुझ्या केसांत
मन गुंतत गेलं
विचारलं तेव्हा मनाला 
हे काय चाललं
तुला काही कळत नाही
इतकचं मला म्हटलं             
माझचं मन माझ्याकडे
ढुंकूनही पहात नाही
तू नाद लावलास त्याला
आता ते माझं राहिलं नाही .   

prakash bhide4868