मी आजही एकटाच आहे

Started by madhura, August 19, 2012, 10:36:33 PM

Previous topic - Next topic

madhura


होतो जसा काल मी
आजही तसाच आहे ।
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


काळोखाची राञ
आज माझ्या कूशित आहे
निरभ्र ते आकाश
आज का उदास आहे ?
पहावयास कोणीच नाही
चंद्र आणि नक्षञ आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


रोजचे ते रातकिडे
आज का निशब्द आहे ?
गजबजलेल्या पाऊलवाटा
आज ऊगाच स्तब्द आहे
सोबतीला आज माझ्या
फक्त हा एकांत आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


निजल्या दिशा, निजले तारे
निजला हा असमंत आहे
आज माझी निद्राराणी
का मजवरी रुष्ट आहे ?
एकलाच शोधतो मी
हरवले माझे अस्तित्व आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


होतो जसा काल मी
आजही तसाच आहे ।
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


-- BY  कवीकुमार

PRAMOD AWATADE

अप्रतिम काव्यधारा

केदार मेहेंदळे