अधुरी प्रेम कहाणी

Started by SANJAY M NIKUMBH, August 20, 2012, 09:16:06 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रत्येक वेळी फुलं समजून
तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही
प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात
चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू  दिली नाही 
असं नाही की
माझ्या प्रेमाला तू
साथ दिली नाही
तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी
काही सीमारेषा तू न मी
कुणीही पुसू शकलं नाही